World Cup 2023: वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा; 'या' प्रमुख खेळाडूंना टीममधून डच्चू

5 ऑक्टोबरपासून आयसीसी वनडे वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. यासाठी बीसीसीआयने आज वर्ल्डकपसाठीच्या स्क्वॉडची घोषणा केली आहे.

बीसीसीआयने एकूण 15 खेळाडूंची टीम जाहीर केली असून रोहित शर्माच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा देण्यात आलेली आहे.

दरम्यान वर्ल्डकप स्क्वॉडमध्ये 3 खेळाडू असे आहेत, ज्याचं वर्ल्डकप खेळण्याचं स्वप्न भंगलं आहे.

यामध्ये पहिलं नावं आहे ते रविचंद्रन अश्विनचं. टीम इंडियाचा उत्तम स्पिनर म्हणून अश्विनची ओळख आहे. मात्र वर्ल्डकपच्या स्क्वॉडमध्ये त्याच्या नावाचा विचार केलेला नाही.

2019 च्या वर्ल्डकपमध्येही युझवेंद्र चहलला टीममधून डावलण्यात आलं होतं. दरम्यान 2023 च्या वर्ल्डकपसाठीही त्याला संधी देण्यात आली नाही.

एशिया कपची टीम जेव्हा जाहीर करण्यात आली होती तेव्हा रोहित शर्मा म्हणाला होता की, "अश्विन आणि चहल चांगले खेळाडू असून त्यांना एशिया कपमध्ये स्थान देण्यात आलं नाही, याचा अर्थ असा नाही त्यांना वर्ल्डकपमध्ये संधी मिळणार नाही. त्यांना वर्ल्डकपमध्ये संधी दिली जाऊ शकते." मात्र असं असूनही अश्विन आणि चहलला संधी मिळाली नाही.

टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनलाही डच्चू मिळाला आहे. एशिया कपमध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता, मात्र वर्ल्डकपच्या टीममधून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

VIEW ALL

Read Next Story