या सामन्यासाठी मैदानात टॉस उडवण्यासाठी उतरताच रोहित शर्माने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला. रोहितचा कर्णधार म्हणून हा 100 वा सामना आहे.
100 किंवा त्याहून अधिक सामन्यांमध्ये भारताचे कर्णधारपद भूषवणारा तो सातवा खेळाडू आहे.
100 किंवा त्याहून अधिक सामन्यांमध्ये भारताचे कर्णधारपद भूषवणारा तो सातवा खेळाडू आहे.
याआधी धोनी (332), अझरुद्दीन (221), विराट (213), सौरव गांगुली (196), कपिल देव (108) आणि राहुल द्रविड (104) यांनी ही कामगिरी केली आहे.
या सर्व 7 कर्णधारांमध्ये रोहितची विजयी टक्केवारी जास्त आहे. रोहितने नेतृत्व करताना 99 पैकी 73 सामन्यात विजय मिळवला आहे.
रोहितने नेतृत्व करताना भारताला 2018 आणि 2023 च्या आशिया कपमध्ये विजय मिळवला होता. इतकंच नाही तर 2018 मधील निदाहास ट्रॉफीतही भारताचं नेतृत्व केलं होतं.
यावर्षी झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या फायनलमध्ये त्याने संघाचं नेतृत्व केलं होतं. पण या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता.