उस्मान ख्वाजा हा वॉर्नरचा लहानपणापासूनचा मित्र. वॉर्नरच्या शेवटच्या इनिंग्जवेळी दोघं पायऱ्या उतरून बाऊंड्रीपाशी आले होते अन् गळाभेट घेतली.
वॉर्नरची शेवटची कसोटी पाहायला उस्मानची आई आली होती. मॅच संपल्यावर त्या वॉर्नरला भेटल्या आणि कडकडून मिठी मारली.
वॉर्नर आमच्या कुटूंबाचा भाग आहे, असं म्हणत उस्मान ख्वाजा भावूक झाल्याचं पहायला मिळालं होतं. त्यावेळी त्याने आई आणि वॉर्नरची आठवण सांगितली.
जेव्हा ख्वाजाला त्याच्या आई आणि वॉर्नर यांच्या भेटीबद्दल विचारलं तेव्हा माझी आई त्याला शैतान म्हणते, असं ख्वाजाने म्हटलं.
उस्मान ख्वाजाची आई डेव्हिड वॉर्नरला 'शैतान' का म्हणते? असा सवाल अनेकांना पडला होता. त्यावर ख्वाजाने स्वत: उत्तर दिलं.
माझी आई वॉर्नरला तेव्हापासून ओळखते, जेव्हापासून मी त्याला ओळखतो. माझी आई त्याच्यावर खुप प्रेम करते, त्यामुळे ती त्याला प्रेमाने ‘शैतान’ म्हणते, असं ख्वाजाने सांगितलं.
शिंगखुपश्या मारकुट्या बैलासारखा वाटणाऱ्या वॉर्नरने आता वनडे आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे आता मैदानात उड्या मारणाऱ्या रांगड्या खेळाडूला फक्त टी-ट्वेंटीमध्ये पाहता येईल.