टीम इंडियाने सुपर 8 मध्ये क्वालिफाय केलं तर कोणत्या तीन संघांशी होतील सामने?

टीम इंडियाचं शेड्यूल

आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आता टीम इंडियाचं शेड्यूल जाहीर झालंय. ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडिया 4 सामने खेळेल.

आयर्लंड

भारताचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध येत्या 5 जून रोजी होईल. तर येत्या 9 तारखेला भारत पाकिस्ताविरुद्ध भिडणार आहे.

युएसए

पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून भारताला 12 तारखेला युएसए संघाशी दोन हात करायचे आहेत.

कॅनडा

तर टीम इंडिया ग्रुप स्टेजमध्ये अखेरचा सामना कॅनडाविरुद्ध खेळेल. त्यानंतर टीम इंडिया सुपर 8 मध्ये क्वालिफाय करेल.

न्यूझीलंड

पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला तर सुपर-8 मध्ये टीम इंडिया 20 जून रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे.

श्रीलंका

तर 22 जून रोजी टीम इंडियाचा सामना श्रीलंकेशी होईल. तसेच 24 जून रोजी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाशी भिडावं लागणार आहे.

29 जून - फायनल

सुपर-8 मधून चार संघ घरी जातील आणि 4 संघ सेमीफायनल सामना खेळणार आहे. त्यानंतर 29 जून रोजी फायनल सामना होईल.

VIEW ALL

Read Next Story