राहुल द्रविडचा खेळ खल्लास?

कोण असेल टीम इंडियाचा नवा कोच?

राहुल द्रविडचा कार्यकाळ

विश्वचषक २०२३ नंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ या वर्षी संपत आहे. 2023 च्या विश्वचषकानंतर राहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडू शकतो, अशी माहिती समोर आलीये.

आशिष नेहरा

भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा हा क्रिकेटचा हुशार रणनितीकार मानला जातो. आशिष नेहरा हा टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट आहे आणि तो टीम इंडियाला जगातील सर्वोत्तम संघ बनवू शकतो

गुजरात टायटन्स

आशिष नेहरा आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचा कोच आहे आणि त्याच्या कोचिंगमध्ये त्यानं या संघाला आयपीएल सीझन 2022 चं विजेतेपदही जिंकून दिलंय.

वीरेंद्र सेहवाग

वीरेंद्र सेहवाग टीम इंडियाचे पुढचा प्रशिक्षक झाला तर तो टीम इंडियात आक्रमक विचार आणेल. आपल्या आक्रमक प्रशिक्षणामुळे वीरेंद्र सेहवाग टीम इंडियाला ते यश मिळवून देऊ शकतो जे न्यूझीलंडचा दिग्गज ब्रेंडन मॅक्युलम आजकाल कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडला देत आहे.

ब्रँडन मॅक्युलम

ब्रँडन मॅक्युलमची आक्रमक कोचिंग शैली आता बेसबॉल म्हणून ओळखली जाते. सेहवागने यापूर्वीच टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, त्याला संधी मिळाली नाही.

स्टीफन फ्लेमिंग

न्यूझीलंडचे दिग्गज स्टीफन फ्लेमिंग हे टीम इंडियाचे पुढील प्रशिक्षक होण्यासाठी सर्वात मोठे दावेदार आहेत. स्टीफन फ्लेमिंग हे जागतिक क्रिकेटमध्ये खूप यशस्वी प्रशिक्षक राहिले आहेत

चेन्नई सुपर किंग्ज

स्टीफन फ्लेमिंग यांच्या प्रशिक्षणाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. स्टीफन फ्लेमिंग हे चतुर रणनितीकार आहेत.

टॉम मूडी

ऑस्ट्रेलियन दिग्गज टॉम मूडी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक आहेत. टॉम मूडी यांच्या प्रशिक्षणाखाली सनरायझर्स हैदराबादने प्रथमच आयपीएलचे विजेतेपद पटकावलं होतं.

सनरायझर्स हैदराबाद

टॉम मूडी यांच्या प्रशिक्षणाखाली सनरायझर्स हैदराबादने २०१६ मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. 2017 मध्ये टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी टॉम मूडी यांची मुलाखत घेण्यात आली होती.

VIEW ALL

Read Next Story