पहिल्या टेस्टमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. रविंद्र जडेजा आणि केएल राहुल संघाबाहेर गेले आहेत.
दोन्ही दिग्गज खेळाडूंच्या जागेवर आता तीन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीये. सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार यांना जागा देण्यात आलीये.
नव्या खेळाडूंमधील सौरभ कुमार नाव सर्वांसाठी नवं आहे. थेट सर जडेजाची जागा घेणारा सौरभ कुमार आहे तरी कोण?
सौरभ कुमार हा उत्तर प्रदेशातील बागपतचा रहिवासी असून तो रणजी ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशकडून खेळतो. त्याने 2022 मध्ये भारत अ आणि न्यूझीलंड अ संघाविरुद्ध खेळताना 9 विकेट्स घेत धमाका केला होता.
सौरभ कुमार हा ऑलराऊंडर असून त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 68 सामन्यांत 27.11 च्या सरासरीने 2061 धावा केल्या आहेत. तर 290 विकेट्स देखील त्याच्या नावावर आहेत.
सौरभ कुमारने 35 लिस्ट ए सामन्यात 314 धावा केल्या आहेत आणि 49 विकेट घेतल्या आहेत. इंग्लंड लायन्सविरुद्ध त्याने 5 विकेट्स घेत पाहुण्या संघाला मात दिली होती.
2021च्या आयपीएल हंगामात सौरभ कुमारला पंजाब किंग्जने बेस प्राईजवर म्हणजेच 20 लाखच्या किमतीत खरेदी केलं होतं. मात्र, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.