IPL 2023 : फायनलमध्ये शेवटच्या 2 चेंडूंपूर्वी हार्दिकने मोहितला नेमकं काय सांगितलं? अखेर उलगडा झालाच!

आयपीएल 2023

आयपीएल 2023 चा हंगाम मोठ्या उत्साहात संपला

चेन्नईचा विजय

चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव करत पाचव्यांदा आयपीएल जिंकली आहे

2 चेंडूत 10 धावांची आवश्यक

सामन्याच्या शेवटच्या 2 चेंडूत 10 धावांची आवश्यकता होती, गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहित शर्मा गोलंदाजी करत होता

रवींद्र जडेजाची खेळी

चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर षटकार आणि शेवटच्या चेंडूवर चौकार मारून चेन्नई सुपर किंग्जने IPL 2023 चे विजेतेपद पटकावले.

मोहित शर्मा होता गोलंदाज

मोहित शर्माने ओव्हरचे पहिले 4 चेंडू चांगल्या पद्धतीने टाकले पण शेवटचे दोन चेंडू असे का पडले हा प्रश्न सर्वांना पडला आहे

हार्दिक पंड्या

प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार चौथ्या चेंडूनंतर कर्णधार हार्दिक पंड्या मोहित शर्माशी चर्चा करताना दिसला, त्यानंतर मोहित शर्मा अस्वस्थ झाला आणि त्याने सामना गमावला

काय झाली नेमकी चर्चा?

या सर्व चर्चेबद्दल मोहित शर्माने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, हार्दिकला फक्त मी काय करणार होतो हे जाणून घ्यायचे होतं.

मोहित म्हणाला...

मोहित म्हणाला की, मी यॅार्कर टाकण्याचा प्रयत्न करेन. यावेळी त्याने होणाऱ्या सर्व चर्चा फेटाळल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story