वर्ल्ड कपआधी विराट करतोय खास तयारी
आशिया कपचं शेड्युल जाहीर झाल्यानंतर आता सर्वांची उत्सुकता लागलीये ती भारत पाकिस्तान सामन्याची.
भारत आणि पाकिस्तान 15 दिवसांच्या कलावधीत तीन वेळा आमने सामने येणार आहे.
भारत-पाकिस्तान सामना म्हटलं की, दोन्ही देशांसाठी हा इज्जतीचा विषय.
त्यामुळे आता दोन्ही संघ कसून तयारीनिशी मैदानात उतरणार आहेत. अशातच आता टीम इंडियाचा स्टार विराट कोहलीने देखील दंड थोपटले आहेत.
विराट कोहली हा सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक मानला जातो. त्याच्या फिटनेसचं रहस्य हेल्दी फूड आणि वर्कआउट्स हे आहे
विराट कोहली त्याच्या फिटनेसबाबत नेहमीच सतर्क असतो. त्यामुळे विराटची गणना भारतातील बेस्ट फील्डरमध्ये केली जाते.
अशातच आता विराट कोहलीने जिममधील फोटो शेअर केले आहेत.
दरम्यान, 20 जुलैपासून वेस्ट इंडिज आणि टीम इंडिया यांच्यामध्ये दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना होणार आहे.