आरसीबीविरुद्धच्या सामन्यात ट्रेविस हेडने हैदराबादकडून वादळी शतक ठोकलं. एसआरएचच्या इतिहासातील हे सर्वात जलद शतक होतं.
ट्रॅव्हिस हेडने आयपीएलमधील चौथे जलद शतक ठोकलं. आत्तापर्यंत आयपीएलमधील सर्वात जलद शतक कोणी ठोकलंय? पाहा
युनिव्हर्सल बॉल ख्रिस गेलने पुणे वॉरियर्स इंजियाविरुद्ध 30 बॉलमध्ये शतक ठोकलं होतं. त्यावेळी त्याने 175 धावा केल्या होत्या.
तर युसूफ पठाणने मुंबई इंडियन्सविरुद्ध 37 बॉलमध्ये 100 धावांची वादळी खेळी केली होती.
पंजाबकडून खेळताना डेव्हिड मिलरने आरसीबीविरुद्ध 38 बॉलमध्ये 101 धावा करत खणखणीत शतक ठोकलं होतं.
तर आता ट्रेविड हेडने 39 बॉलमध्ये शतक ठोकलं आहे. आरसीबीच्या गोलंदाजांचा चुराडा करत हेडने वादळी शतक झळकावलंय.
पाचव्या क्रमांकावर ॲडम गिलख्रिस्ट याचा नंबर लागतो. ॲडम गिलख्रिस्टने 42 बॉलमध्ये शतक ठोकलं होतं.