टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. इथे टी20 वर्ल्ड कप 2024 साठी तो जोरदार तयारी करतोय.

त्याआधी हार्दिकने IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं होतं. यादरम्यान, हार्दिक पांड्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

रिपोर्टनुसार हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा स्टानकोविक यांच्या नात्यात दुरावा आला आहे. आणि लवकरच ते घटस्फोट घेणार असल्याचं बोललं जातंय.

याबाबत हार्दिक किंवा नताशाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण त्यांच्या लग्नाचा एक किस्सा सध्या व्हायरल झाला आहे.

टीम इंडियाचा स्टार हार्दिक पांड्या आणि सर्बियाई मॉडेल नताशा यांचं 2023 मध्ये उदयपूर इथं हिंदू परंपरेने लग्न झालं.

पण यावेळी नताशाचं कन्यादान कोण करणार यावरुन प्रश्न उपस्थित झाला. कन्यादानासाठी कोणीही पुढे आलं नाही.

अशा टीम इंडियाचा विकेटकिपर आणि फलंदाज दिनेश कार्तिक पुढे आला. कार्तिकने नताशाचं कन्यादान केलं.

VIEW ALL

Read Next Story