टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघावर ग्रुप स्टेजमध्येच बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली.
या खराब कामगिरीनंतर पाकिस्तान संघावर जोरदार टीका होऊ लागली आहे. यादरम्यान पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
पाकिस्तान संघात खेळाडूंमध्ये फूट पडली असल्याचा दावा गॅरी कर्स्टन यांनी केला आहे. काही खेळाडू एकमेकांशी बोलतही नसल्याचं कर्स्टन यांनी सांगितलं.
पाकिस्तान क्रिकेट संघात एकमत नाही. हा केवळ नावाला संघ आहे, कोणीही एकमेकाला पाठिंबा देत नसल्याचं कर्स्टन यांनी म्हटलंय.
प्रत्यक खेळाडू स्वत:च्या मर्जीचे मालक आहेत. मी अनेक संघांबरोबर काम केलंय, पण असा संघ पाहिला नसल्याचं कर्स्टन यांनी सांगितलं.
पाकिस्तानी खेळाडूंच्या फिटनेसबाबतही कर्स्टन यांनी खुलासा केला आहे. संघातील अनेक खेळाडू ग्लोबल स्टॅंडर्डपेक्षा खूप मागे आहेत असं ही कर्स्टन यांनी म्हटलंय.
स्पर्धेत खेळाडूंनी खूप खराब फलंदाजी केली. पराभवाचं हे मुख्य कारण असल्याचा दावाही गॅरी कर्स्टन यांनी केला आहे.