टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टी20 वर्ल्ड कपमध्ये अनोखा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

टी20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात आयर्लंडविरुद्ध रोहित शर्माने न्यूयॉर्कच्या अवघड खेळपट्टीवर दमदार फलंदाजी केली.

ज्या खेळपट्टीवर इतर फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करावा लागत होता, त्या खेळपट्टीवर रोहितने 140.54 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.

रोहित शर्माने 37 चेंडूवर 52 धावा केल्या. यात त्याने 4 चौकार आणि 3 खणखणीत षटकार खेचले.

या सामन्यात तीन षटकार खेचत रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विक्रम रचलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकार मारणारा रोहित हा पहिला फलंदाज बनलाय.

रोहित शर्माने 59 कसोटी सामन्यात 84, तर 262 एकिदवसीय सामन्यात 323 षटकार मारलेत.

रोहित शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 152 सामन्यात 193 षटकार मारलेत. याशिवाय रोहित शर्माने टी20 क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पाही पूर्ण केलाय.

VIEW ALL

Read Next Story