यजमान अमेरिकाने टी20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 फेरीत धडक मारली आहे. पण त्यांचा प्रमुख बॉलर सौरभ नेत्रावलकरसमोर नवीनच समस्या उभी राहिली आहे.

Jun 15,2024


टी20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 फेरीत खेळण्यासाठी सौरभ नेत्रावलकरला ऑफिसमधून सुट्टी घ्यावी लागणार आहे.


अमेरिकेने सुपर-8 मध्ये प्रवेश केल्यानंतर सौरभ नेत्रावलकरला सु्ट्टी वाढवून मिळणार का याची चिंता सतावतेय.


सौरभ नेत्रावलकरला 18 जूनपर्यंत सुट्टी मंजूर करण्यात आली होती. पण आता अमेरिकेने सर्वांना आश्चर्यचकित करत सुपर-8 मध्ये प्रवेश केलाय.


सुपर-8 मध्ये अमेरिका क्रिकेट संघाला तीन सामने खेळायचे आहेत. 19 जून ते 24 जूनपर्यंत सुपर-8 चे सामने रंगणार आहेत. या काळात सौरभला सु्ट्टी घ्यावी लागणार आहे.


सौरभ नेत्रावलकर ORACLE कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो.


टी20 वर्ल्ड कपच्या ग्रूप सामन्यातही सौरभ हॉटेलमध्ये आपला लॅपटॉप जवळ बाळगत होता. सामन्यानंतर हॉटेलमध्ये गेल्यावर तो आपल्या ऑफिसच काम करायचा.

VIEW ALL

Read Next Story