भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आणि त्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. सूर्यकुमार यादव यंदाच्या आयपीएलच्या काही सामन्यांना मुकणार आहे.

भारताचा आघाडीचा फलंदाज सूर्यकुमार यादव सतत दुखापतीशी झुंजत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात घोट्याला दुखापत झाल्यानंतर तो अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेला मुकणार आहे.

घोट्याच्या दुखापतीनंतर सूर्यकुमार यादवला स्पोर्ट्स हर्नियाचा त्रास असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे त्याला शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.

स्पोर्ट्स हर्नियामुळे तो मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळू शकणार नाही. तसेच सूर्या आयपीएल 2024 च्या पहिल्या काही सामन्यांना मुकण्याचीही शक्यता आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सूर्यकुमार यादव सध्या एनसीएमध्ये आहेत आणि ते लवकरच स्पोर्ट्स हर्निया ऑपरेशनसाठी जर्मनीला जाणार आहेत.

याचा अर्थ तो रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळू शकणार नाही आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या सुरुवातीच्या सामन्यांनाही तो मुकू शकतो.

जूनमध्ये टी-20 विश्वचषक होणार आहे, सूर्याला यातून सावरण्यासाठी पूर्ण वेळ दिला जाईल. टी-20 विश्वचषकात तो भारतासाठी महत्त्वाचा आहे, असेही बीसीसीआयच्या सूत्रांनी म्हटलं आहे.

2022 मध्ये भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुललाही स्पोर्ट्स हर्नियाचा त्रास झाला होता, ज्यासाठी जर्मनीमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. राहुलही दुखापतीमुळे आयपीएलनंतर काही महिने बाहेर होता.

VIEW ALL

Read Next Story