चक्क ग्रह-नक्षत्र पाहून एशिय कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आल्याचं बोललं जात आहे. धक्कादायक म्हणजे यासाठी लाखो रुपये करण्यात आलेत.

भारतीय फुटबॉल संघाने जून 2022 मध्ये शानदार कामगिरी करत एएफसी एशियन कपमध्ये क्वालिफाय केलं होतं.

भारतीय फुटबॉल संघाने पात्रता फेरीत आपे तीनही सामने जिंकत पाचव्यांदा एशियन कप स्पर्धेत आपली जागा पक्की केली.

पण आता भारतीय संघाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबत एक धक्कादायक रिपोर्ट दिला आहे.

भारतीय संघाचे फुटबॉल प्रशिक्षक इगोर स्टिमक यांनी संघाची निवड स्वत: केली नव्हती तर खेळाडूंची यादी एका ज्योतिषाला पाठवली होती.

कहर म्हणजे या कामासाठी ऑल इंडिया फुटबल फेडरेशनने ज्योतिषीला 12 ते 15 लाखांचं पेमेंटही केलं. ज्योतिषाने सांगितल्यानंतर खेळाडूंची निवड करण्यात आली.

गेल्या वर्षी जूनमध्येही अफगाणिस्तानविरुद्ध सामन्याच्या 48 तास आधी प्रशिक्षकाने दिल्लीतल्या एका ज्योतिषाचा सल्ला घेतला होता.

VIEW ALL

Read Next Story