भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने बुधवारी (6 डिसेंबर) 29 वा वाढदिवस साजरा केला. मात्र चर्चा धनश्री वर्माची आहे.
श्रेयस अय्यरच्या वाढदिवसानिमित्त युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने खास इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली होती.
श्रेयस अय्यर आणि युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा हे दोघेही चांगले मित्र आहेत.
अनेकदा श्रेयस अय्यर आणि धनश्री एकत्र दिसून आले आहेत. अनेक रिल्समध्ये या दोघांनी एकत्र डान्सही केला आहे.
मात्र या दोघांबद्दल अनेक अफवा वेळेवेळी व्हायरल होत असतात. या अफवांना या दोघांबरोबरच युजवेंद्र चहलही फारसं महत्त्व देत नाही.
मात्र या तिघांच्या नात्याबद्दल अनेकदा उलट सुलट चर्चा सुरु असतात. त्यातच आता धनश्रीने अय्यरला वाढदिसवाच्या खास शुभेच्छा दिल्यात.
धनश्रीने तिच्या आईबरोबरच श्रेयसचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला पोस्ट केला.
श्रेयच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या या फोटोवर धनश्रीने 'हॅपी बर्थ डे श्रेयस अय्यर' असं श्रेयसला टॅग करुन म्हटलं आहे.
धनश्रीच्या या इन्स्टाग्राम स्टोरीचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे.