धोनीच्या सीएसकेला धक्का, हा खेळाडू झाला IPL च्या आधी जखमी.
आयपीएलच्या 17 व्या सीझनचे बिगुल हे 22 मार्च पासुन वाजणार आहेत. IPL चा सध्याचा हंगाम हा भारतातच खेळवरा जाणार आहे.
आयपीएल सुरू होण्याआधीच धोनीच्या कप्तानी खाली असलेल्या सीएसकेला मोठा झटका बसलेला आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा सलामीचा फलंदाज डेवोन कॉन्वे याला डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात विकेटकिपिंग करताना कॉन्वेला डाव्या अंगठ्याला ही दुखापत झाली.
या दुखापतीमुळे, कॉन्वे याला मैदान सोडावे लागले होते. त्याच्याजागी राहिलेल्या सामन्यात फिन एलन की विकेटकिपिंग केली.
32 वर्षीय कॉन्वे याने आयपीएल 2023 मध्ये दमदार कामगिरी करत, सीएसकेला पाचव्यांदा चैंपियन बनवण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. त्याने सीएसकेसाठी सर्व्यात जास्त 672 धावा बनवल्या होत्या.
कॉन्वे न्युझीलॅंडसाठी इंटरनॅशनल क्रिकेट खेळतो. त्याने आतापर्यंत 20 टेस्ट, 32 एकदिवसीय आणि 46 टी-20 इंटरनॅशनल सामने खेळला आहे.
आयपीएल 2024 मध्ये गतविजेती सीएसके आपली पहिली मॅच 22 मार्च रोजी रॉयल चैलेंजर्स बॅंगलोर विरूद्ध खेळणार.