बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि कतरीना कैफनंतर सारा तेंडुलकरला डीपफेक फोटोला सामोरं जावं लागलं होतं,

सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकरचा एक फोटो एडिट करत तो चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आला होता.

इतकंच नाही तर सारा तेंडुलकरच्या नावाने सोशल मीडियावर फेक अकाऊंटही बनवण्यात आलं आहे. या अकाऊंटवरुनच फेक फोटो शेअर करण्यात आला.

सारा आणि अर्जुनच्या फोटोशी छेडछाड करत सारा तेंडुलकर शुभमन गिलच्या खांद्यावर हात टाकत फोटोसाठी पोझ देत असल्याचं यात दाखवण्यात आलं होतं.

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सारा चांगलीच संतापली आहे. तीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे.

तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर केला जात आहे. हे खूप चिंताजनक आहे. यामुळे सत्यापासून आपण दूर जात असल्याचं साराने म्हटलंय.

डिपफेक तंत्रज्ञानाच्या मदतीने माझे काही फोटो व्हायरल करण्यात आले. जे मुळ फोटोपेक्षा खूप वेगळा आहे. हे खूप त्रासदायक असल्याचंही तीने म्हटलंय.

VIEW ALL

Read Next Story