अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर हे बॉलिवूडमधलं लोकप्रिय जोडपं आहे. या दोघांनी अनेक सुपर हिट चित्रपट दिलेत.

अभिनयानंतर आता सैफ अली खान आणि करीना कपूरने क्रिकेटमध्ये एन्ट्री केली आहे. दोघांनी कोलकाता संघाची मालकी विकत घेतलीय.

अभिनेत्री करीना कपूरने इन्स्टाग्रामवर याबाबतची घोषणा केली आहे. 'क्रिकेट ही आपल्या कुटुंबाची गेल्या अनेक काळापासून चालत आलेली परंपरा असल्याचं' करीनाने आपल्या पोस्ट मध्ये म्हटलंय.

इंडियन स्ट्रीट प्रीमिअर लीगमधल्या कोलकाता संघावर या सैफ आणि करीनाने पैसे गुंतवले आहेत. युवा खेळाडूंसाठी ही चांगली संधी असल्याचं करीनाने म्हटलं आहे.

ISPL मध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनी पैसे गुंतवले आहेत. अमिताभ बच्चन यांनी मुंबई, अक्षय कुमारने श्रीनगर आणि ऋतिक रोशनने बंगळुरु संघांचा मालक आहे.

2 ते 9 मार्चदरम्यान ISPL स्पर्धा होणार असून देशातील ही पहिली टेनिस बॉल टी10 स्पर्धा आहे. या स्पर्धेचे सर्व सामने मुंबईत होणार आहेत.

आएसपीएलमध्ये एकूण सहा संघांचा सहभाग आहे. यात मुंबई, हैदराबाद, बंगळुरु, चेन्नई, कोलकाता आणि श्रीनगर संघांचा समावेश आहे.

VIEW ALL

Read Next Story