एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण?

तुमचं उत्तर रोहित शर्मा असं असेल तर ते चुकीचं आहे. पहिल्या स्थानी एक भारतीय आहे पण तो रोहित शर्मा नाही. पाहा TOP 10 फलंदाजांची यादी...

टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ याने इंग्लंडमध्ये एक अनोखा विक्रम केला आहे.

इंग्लंडमधील 'रॉयल लंडन वन डे कप' स्पर्धेत पृथ्वी शॉने द्विशतक झळकावलं आहे.

जगातील तिसरा फलंदाज ज्याने...

रॉयल लंडन वन डे कपमध्ये द्विशतक झळकावणारा पृथ्वी शॉ हा जगातील फक्त तिसरा फलंदाज आहे.

28 चौकार आणि 11 षटकार

पृथ्वी शॉने स्फोटक पद्धतीने खेळत 153 चेंडूत 244 धावांची खेळी केली. यात 28 चौकार आणि 11 षटकार शॉने लगावले.

सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या करणारे खेळाडू कोण?

मात्र एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या करणारे खेळाडू कोण आहेत तुम्हाला माहितीये का?

रोहित शर्मा पहिल्या स्थानी नाही

नाही तुमचा अंदाज चुकत आहे या यादीमध्ये रोहित पहिल्या स्थानी नाही. टॉप 10 मध्ये कोण आहे पाहूयात...

पृथ्वीने मुंबईकडून खेळतानाही केलीय दमदार कामगिरी

सर्वाधिक धावा करणाऱ्या Top 10 फलंदाजांमध्ये पृथ्वी शॉचा 2 वेळा समावेश आहे. त्याने 25 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबईच्या संघासाठी खेळताना 152 चेंडूंमध्ये 227 धावा केलेल्या.

नवव्या स्थानी कोण?

ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर बॅट्समन बेन ड्यूंक हा या यादीमध्ये नाबाद 229 धावांसहीत नवव्या स्थानी आहे. त्याने टास्मानियाच्या संघाकडून खेळताना 18 ऑक्टोबर 2014 मध्ये हा विक्रम केलेला.

याने केलीय 230 धावांची खेळी

ऑस्ट्रेलियाचा ट्रेविस हेड हा या यादीमध्ये आठव्या स्थानी असून त्याने साऊथ ऑस्ट्रेलियाकडून खेळताना क्विन्सलॅण्डवरुद्ध 230 धावांची खेळी अवघ्या 127 चेंडूमध्ये केलेली.

न्यूझीलंडंचा स्फोटक फलंदाज सातव्या क्रमांकावर

न्यूझीलंडंचा फलंदाज मार्टिन गप्टील हा या यादीमध्ये सातव्या स्थानी असून त्याने 163 चेंडूंमध्ये 237 धावांची नाबाद खेळी 2015 मध्ये केली होती. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने ही खेळी 21 मार्च रोजी केलेली.

सहाव्या स्थानी शहा

पृथ्वी शॉ सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानीही आहे. त्याने 9 ऑगस्ट 2023 रोजी नॉर्दन हॅम्पशायरकडून खेळताना 244 धावा केल्या.

शिखर धवनही या यादीमध्ये

या यादीमध्ये भारताचा स्फोटक फलंदाज शिखर धवनचाही पाचव्या स्थानावर समावेश आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 12 ऑगस्ट 2013 मध्ये पोर्टेरियामध्ये 150 चेंडूमध्ये 248 धावा केल्या.

चौथ्या स्थानी ऑस्ट्रेलियन खेळाडू

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ड्रॅकी शॉर्टनेही 257 धावांची दमदार खेळी 2018 साली केलेली 28 सप्टेंबर रोजी त्याने वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळताना क्विन्सलॅण्डसंघाविरुद्ध अवघ्या 148 चेंडूंमध्ये या धावा केलेल्या. तो या यादीत चौथ्या स्थानी आहे.

रोहित शर्माही या मानाच्या यादीत

भारताचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. त्याने कोलकात्यामध्ये 13 नोव्हेंबर 2014 रोजी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 173 बॉलमध्ये 264 धावा केलेल्या.

इंग्लिश खेळाडू दुसऱ्या स्थानी

इंग्लंडमधील फलंदाज अली ब्राऊन हा यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याने 268 धावा केल्या आहेत. 19 जून 2022 रोजी ओव्हलच्या मैदानामध्ये Surrey Vs Glamorgan सामन्यात Surrey कडून खेळताना त्याने 160 चेंडूत या धावा केल्या.

सीएसकेचा खेळाडू अव्वल स्थानी

सीएसकेकडून खेळणारा नायर जगदीशन हा या यादीमध्ये पहिल्या स्थानी आहे. तामिळनाडूच्या या खेळाडूने एकदिवसीय सामन्यांमध्ये वैयक्तिक स्तरावर एकाच डावात सर्वाधिक धावा केल्यात.

141 चेंडूंमध्ये एकट्याने 277 धावा कुटल्या

नायर जगदीशनने 141 चेंडूंमध्ये एकट्याने 277 धावा कुटल्या. त्याने तामिळनाडूकडून अरुणाचलविरुद्ध खेळताना 21 नोव्हेंबर 2022 रोजी बंगळुरुमध्ये विजय हजारे चषक स्पर्धेत ही कामगिरी केली.

VIEW ALL

Read Next Story