इशांत शर्माचा ऋषभ पंतबाबत धक्कादायक खुलासा

म्हणाला 'वर्ल्ड कप सोडा तो आयपीएल पण...'

भारत आणि वेस्ट इंडिज कसोटी सामन्यात जिओ सिनेमावर इशांत शर्मा समालोचनाची जबाबदारी पार पाडत आहे.

यावेळी इशांत शर्माला विचारण्यात आलं की, पंत कधीपर्यंत मैदानात परतणार आहेत?

ऋषभ पंतच्या प्रश्नावर उत्तर देताना इशांत शर्माने धक्कादायक खुलासा केला आहे.

ऋषभ पंत एकदिवसीय विश्वचषकापर्यंत टीम इंडियात पुनरागमन करू शकतो अशी चर्चा योग्य नाही, असं इशांत शर्मा म्हणाला आहे.

मी त्याला आयपीएल 2023 दरम्यान भेटलो आणि त्याच आधारावर मी सांगत आहे की एकदिवसीय विश्वचषक 2023 बाजूला ठेवा, तो पुढील आयपीएलपर्यंत क्रिकेटमध्ये परत येऊ शकणार नाही, असा खुलासा इशांत शर्माने केला आहे.

नुकतीच त्याने फलंदाजी आणि विकेटकीपिंगला सुरुवात केली आहे. त्यानंतर धावणं आणि मागं वळणं यासह अनेक गोष्टी आहेत, असं इशांत म्हणतो.

विकेटकिपिंग आणि फलंदाजासाठी अशा परिस्थितीतून येणं सोपं नाही, असंही इशांत शर्माने म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story