आयपीएल 2024 नंतर लगेचच टी-20 वर्ल्ड कप सुरू होणार आहे. यामुळे भारतीय टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंना चांगले प्रदर्शन करावं लागणार आहे.
यामध्येच ऋषभ पंतचे इंडियन टीमच्या वर्ल्ड कप संघात स्थान पक्कं होणार की नाही? यावर अजून मात्र प्रश्नचिन्हच निर्माण झाला होता.
ऋषभ पंतच्या झालेल्या दुर्देवी अपघातामुळे, तो आयपीएल 2024 खेळण्याआधी क्रिकेटपासून जवळपास एक वर्ष लांब होता. ऋषभ पंतचा 30 डिसेंबर 2022 ला भीषण अपघात झाला होता.
यानंतर ऋषभ पंत हा एकूण 8 महिने हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होता, रिकव्हरी झाल्यानंतर ऋषभने आपल्या फिटनेसवर पण खूप काम केलं.
मात्र, आयपीएल 2024 मध्ये ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन म्हणून संघात पुनरागमन केलंय. तसेच तो फलंदाजीत देखील चमक दाखवतोय.
अशातच आता ऋषभ पंतला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये जागा दिली जाईल, अशी माहिती क्रिकबझने दिली आहे
ऋषभने आयपीएल 2024 खेळलेल्या 4 मॅचेस मध्ये प्रभावी प्रदर्शन करत एकूण 152 धावा काढल्या आहेत, यात 2 अर्धशतक सामील आहेत.
अनेक क्रिकेटतज्ञांचे मते, जूनमध्ये होणाऱ्या क्रिकेट टी-20 वर्ल्ड कपमध्ये ऋषभ पंतला भारतीय क्रिकेट संघाच्या स्क्वॉडमध्ये जागा मिळण्याची शक्यता आहे.
दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पॉटिंग याने सुद्धा पंतच्या प्रदर्शनाची प्रशंसा केली होती, 'ऋषभ पंत हा नेट्स सेशनमध्ये फारच चांगली फलंदाजी करतोय आणि मला विश्वास आहे की तो नक्कीच भारतीय टीममध्ये आपली जागा मिळवेल'