भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री काही दिवसांपासून चर्चेत आहेत. असा दावा केला जातो की, चहल आणि धनश्री यांचा घटस्फोट होणार आहे.
काही जणांनी यांच्यात घटस्फोट होणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र या दरम्यान चहलने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
चहलने आपल्या पोस्टमध्ये खऱ्या प्रेमावर भाष्य केलं आहे. त्याने म्हटलंय की, खरं प्रेम मिळणं खूप कठीण असतं.
चहलने आपले काही फोटो पोस्ट करत म्हटलं आहे की, खरं प्रेम खूप दुर्लभ असतं. आणि माझं नाव 'दुर्लभ' आहे.
चहलने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.
आतापर्यंत चहल आणि धनश्री यांनी घटस्फोटावर कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण या अफवा त्यांनी नाकारल्या देखील नाहीत.
धनश्री वर्मा पेशाने कोरिओग्राफर आहे. सोशल मीडियावर तिचे 63 लाख फॉलोअर्स आहेत.
बरेच दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर युजवेंद्र चहलसोबत धनश्रीने 22 डिसेंबर 2020 रोजी लग्न केलंय
चहल टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारतीय संघाचा हिस्सा होता. पण त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही.
चहल आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्स करता खेळणार आहे. त्याला 18 कोटींना संघात घेतलं आहे.