Paris Olympic 2024: ऑलिम्पिक गाजवणारी कुस्तीपट्टू विनेश फोगाट आहे तरी कोण ?

Aug 07,2024


क्रिडा विश्वात सध्या ऑलिम्पिकचे वारे वाहत आहेत. भारताच्या दोन खेळाडूंनी पॅरिसमध्ये पदकाची कमाई केली आहे.


नुकतंच विनेश फोगाटने विश्वविजेती जपानच्या युई सुसाकीचा पहिल्याच सामन्यात पराभव केला. 50 किलो गटाच्या अंतिम फेरीत पोहोचलेली विनेश पहिली महिला भारतीय कुस्तीपट्टू ठरली.


विनेशच्या कामगिरीचं देशात आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वत्र कौतुक होत आहे. पण विनेश नक्की आहे तरी कोण आणि तिचा इथपर्यंतचा प्रवास कसा होता ते जाणून घेऊयात.


विनेशचा जन्म 25 ऑगस्ट 1994 रोजी हरियाणातील भिवानी येथे झाला होता.


विनेशला लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती. याचं कारण म्हणजे तिचे काका होते.


विनेश ही 'द्रोणाचार्य पुरस्कार'प्राप्त महावीर सिंह फोगाट यांची पुतणी आहे. फोगाट कुटुंबाला कुस्तीचा सर्वात मोठा वारसा लाभलेला आहे.


विनेशने पद्युत्तर शिक्षण रोहतकमध्ये पूर्ण केलं.


2018 मध्ये 'आशियाई क्रीडा स्पर्धे'त विनेश सुवर्णपदक विजेती ठरली होती.


2018 च्या 'राष्ट्रकुल स्पर्धे'त तिनं सुवर्णपदक पटकावलं होतं.


2016 ते 2018 मध्ये तीन वेळा विनेश 'कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप' सुवर्णपदकाची मानकरी ठरली.

VIEW ALL

Read Next Story