भारताचा स्टार भालाफेकपट्टू नीरज चोप्रा याने वर्ल्ड कप फायनलला हजेरी लावली होती. त्यामुळे तो चर्चेत देखील आला होता.
मी क्रिकेटचा सामना पहिल्यांदाच पूर्ण पाहिला. मला येईला उशिर झाला. मी फ्लाईटमध्ये सामना पाहत होतो, असं नीरज चोप्राने म्हटलंय.
नीरजने एका कार्यक्रमात बोलताना टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याला खास सल्ला दिला आहे.
मला जसप्रीत बुमराह आणि त्याची शैली आवडते. मला त्याची ऍक्शन अनोखी वाटते, असं नीरज चोप्रा याने म्हटलं आहे.
बुमराहच्या बॉलिंगचा वेग वाढवण्यासाठी तो रन-अप वाढवू शकतो, असं मला वाटतं. त्याचा त्याला फायदा होईल, असं म्हणत नीरजने बुमराहला सल्ला दिला आहे.
गोलंदाजांनी त्यांच्या रन-अपला थोडं पुढं जाऊन सुरुवात केली तर त्यांचा वेग कसा वाढू शकतो, याची मला थोडी कल्पना आहे, त्यामुळे मी बोलू शकतो, असं नीरजने म्हटलं आहे.