शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी उलथा पालथ झालीय. अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारबरोबर हातमिळवणी केली.
शरद पवा वयाच्या 83 व्या वर्षी पक्षाची पुन्हा बांधणी करण्यासाठी मैदानात उतरलेत. लवकरच ते राज्यव्यापी दौरा करणार आहेत.
शरद पवार यांचं क्रिकेटशी जवळचं नातं आहे. 2005-08 दौऱ्यान ते बीसीसीआयचे अध्यक्ष होते. त्यांनी आयसीसीचं अध्यक्षपदही सांभाळलं आहे
शरद पवार यांच्या सासऱ्याचं नाव सदाशिव शिंदे असं आहे. सदाशिव शिंदे हे टीम इंडियासाठी खेळायचे.
अगदी लहान वयातच सदाशिव शिंदे यांनी क्रिकेटमध्ये आपलं नाव केलं. त्यांच्या गुगली गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांना नाचवलं.
सदाशिव शिंदे हे सदू शिंदे नावाने परिचित होते. 1946 ते 1952 या काळात सदू शिंदे यांनी भारतासाठी सात कसोटी सामने खेळले. यात त्यांनी 12 विकेट घेतल्या.
सदाशिक शिंदे यांनी कसोटी क्रिकेटमधली सर्वश्रेष्ठ कामगिरी दिल्लीत इंग्लंडविरुद्ध केली होती. त्यांनी एका इनिंगमध्ये 91 धावा देत सहा विकेट घेतल्या होत्या.
सदाशिव शिंदे यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्येही दमदार कामगिरी केली होती. 79 सामन्यात त्यांच्या नावावर तब्बल 230 विकेट घेतल्या होत्या.
सदू शिंदे यांनी 1946 मध्ये भारतीय संघातून खेळताना इंग्लंडचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी 39 विकेट घेतल्या.
सदाशिव शिंदे यांचं तरुणपणातच निधन झालं त्यंना टायफॉईडचा आजार होता.
सदाशिव शिंदे यांची मुलगी प्रतिभा यांनी शरद पवार यांच्याशी 1967 साली लग्न केलं. शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या मुलीचं नाव सुप्रिया सुळे आहे.