टीम इंडियाच्या विजयाच्या शिल्पकार ठरला हार्दिक पांड्या. त्याने आपल्या ऑलराऊंड कामगिरीच्या जोरावर वर्ल्ड कप जिंकून दिलाय.
हार्दिकने मोक्याच्या क्षणी विकेट्स मिळवून दिल्या अन् आपल्या फलंदाजीने उत्तम फिनिशरची भूमिका देखील बजावली.
वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पांड्याच्या डोळ्यात पाणी आलं. भर मैदानात पांड्या ढसाढसा रडताना दिसला.
मात्र, पांड्याच्या खासगी आयुष्यातील वादळ कायम आहे की काय? असा सवाल विचारला जातोय.
त्याला कारण पांड्याची पत्नी नताशा... आयपीएलमध्ये प्रत्येक मॅचला उपस्थित राहणाऱ्या नताशाने पांड्या रडला तरी एकही पोस्ट केली नाही.
नताशाने सोशल मीडियावर एकही पोस्ट केली नाही तर मैदानात देखील नताशा उपस्थित नव्हती. त्यामुळे आता चर्चेला उधाण आलंय.
नताशा गप्प राहिल्याने आता पुन्हा घटस्फोटाच्या चर्चेला उधाण आलं आहे. त्यामुळे दोघांमध्ये सर्व अलबेल आहे का? असा सवाल विचारला जातोय.