टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी घटस्फोट जाहीर केला होता.
हार्दिकसोबतच्या घटस्फोटानंतर नताशा आपल्या मायदेशी म्हणजेच सर्बियाला निघून गेली होती.
नताशासोबत त्यांचा मुलगा आगस्त देखील होता. अशातच आता हार्दिकच्या आनंदाला उधाण आलं आहे.
कारण नताशा स्टॅनकोविक भारतात परतली आहे. नताशा सध्या मुंबईत असल्याची माहिती तिने स्वत: सोशल मीडियावरून दिली.
सोमवारी सकाळी 6 वाजता नताशा मुंबईत आल्याची माहिती आहे. मात्र, नताशासोबत मुलगा आगस्त दिसला नाही.
नताशा मुंबईमध्ये पोहोचताच पावसाने नताशाचं स्वागत केलं. गाडीच्या डिव्हाईसमध्ये 'प्रिव्हियस ट्रॅक' असं म्हणत नताशाने हिंट दिली.
दरम्यान, नताशा मुंबईत असल्याने आता हार्दिकसोबत भेट होणार का? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जातोय.