टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा सध्या प्रसिद्धीच्या उंचीवर आहे. तरी देखील त्याच्या स्वभावातील साधेपणा कमी झालेला नाही.
वनडे वर्ल्ड कपमध्ये झालेल्या पराभवानंतर रोहित शर्मा नाराज झाला होता. आता रोहित पुन्हा आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीला लागला आहे.
सध्या रोहित शर्मा आयपीएल गाजवतोय. आपल्या स्फोटक फलंदाजीने रोहितने मुंबईला जिंकवून देण्याचा प्रयत्न केला पण गोलंदाजीमुळे मुंबईला सामने गमवावे लागले.
रोहित शर्मा कॅप्टन नसल्याने आता त्याच्या खांद्यावरील प्रेशर कमी झालंय. त्यामुळे तो आयपीएल एन्जॉय करताना दिसतोय.
अशातच रोहित शर्माने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो लाल शर्ट घातलेला दिसतोय.
लाले लाल झालेला रोहित शर्मा हाफ पॅन्ट अन् पिवळी चप्पल घालून पार्टी करताना दिसतोय. त्यावर दोन हार्ट कमेंट देखील त्याने केलीये.