शमी रुग्णालयात दाखल! Hospital मधील Photos पाहिले का? शमी म्हणतो, 'मला लवकरच..'

आयपीएलमधून बाहेर

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आयपीएल 2024 स्पर्धेतून बाहेर पडल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली.

थेट रुग्णालयात दाखल

आणि आता तर मोहम्मद शमी थेट रुग्णालयात दाखल असल्याचे फोटो समोर आले आहेत. शमीनेच हे फोटो शेअर केले आहेत.

शमीला नेमकं काय झालं?

शमीला नेमकं काय झालं आहे? तो हे फोटो शेअर करत काय म्हणाला आहे जाणून घेऊयात...

का खेळणार नाही शमी?

मोहम्मद शमी गुजरात टायटन्स संघाकडून आयपीएल खेळतो. मात्र तो 2024 चं पर्व खेळणार नाहीये. यामागील कारण म्हणजे त्याच्या पायाला झालेली दुखापत.

युकेमध्ये झाली शस्त्रक्रीया

शमीच्या पायाला झालेल्या दुखापतीसंदर्भात नुकतीच त्याच्यावर एक शस्त्रक्रीया झाली आहे. ही शस्त्रक्रीया युनायटेड किंग्डममध्ये पार पडली.

शस्रक्रिया यशस्वी

शमीने रुग्णालयातील फोटो शेअर करत आपली शस्रक्रिया यशस्वी झाल्याचं म्हटलं आहे.

कसली शस्त्रक्रिया?

शमीच्या पोटरीचं म्हणजेच Achilles Tendon ची शस्त्रक्रिया पार पडली.

रिकव्हरीला वेळ लागणार

मला रिकव्हरीसाठी काही कालावधी लागणार आहे, असंही शमीने स्पष्ट केलं आहे.

पायावर उभा राहण्याचा प्रयत्न

मात्र लवकरच स्वत:च्या पायावर उभा राहण्याचा माझा प्रयत्न आहे, असंही शमी म्हणाला आहे.

पुनर्वसन व्यवस्थापन कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह

शमी दुखापतीतून न सावरल्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (NCA) दुखापत पुनर्वसन व्यवस्थापन कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

VIEW ALL

Read Next Story