यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये स्टार्कची जादू पहायला मिळाली नसली तरी सेमीफायनलमध्ये त्याने धुरळा उडवलाय. सेमीफायनलमध्ये स्टार्कने पहिल्या सात षटकांत दोन विकेट्स घेतल्या.
स्टार्कने कर्णधार टेम्बा बावुमा आणि उपकर्णधार एडन मार्करामला बाद करत साऊथ अफ्रिकेला गुडघ्यावर बसवलंय.
मिचेल स्टार्कने 2015 मध्ये 22 आणि 2019 च्या टूर्नामेंटमध्ये 27 विकेट घेतल्या होत्या.
तर मिचेल स्टार्कने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये 11 विकेट्स घेतल्या असून त्याने वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला आहे.
मिचेल स्टार्कने ग्लेन मॅकग्राला मागे टाकून एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात जलद 60 बळी घेणारा खेळाडू बनला आहे.
ग्लेन मॅकग्रा याने वर्ल्ड कपमध्ये आत्तापर्यंत सर्वात जास्त म्हणजे 71 विकेट्स नावावर केल्या आहेत. 39 सामन्यात त्याने ही कामगिरी केली होती.
श्रीलंकेच्या मुरलीधरनच्या नावावर वर्ल्ड कपमधील 68 विकेट्सचा पराक्रम नोंदवला गेला आहे. हा रेकॉर्ड स्टार्क मोडणार का? असा सवाल विचारला जात आहे.