पराभव तोंडावर असताना लखनऊ सुपर जायएन्ट्सला विजय मिळवून देणाऱ्या मयंक यादवने पहिल्याच सामन्यात इतिहास रचला.
आयपीएल 2024 मध्ये सर्वात जलद बॉल फेकत मयंकने रेकॉर्ड रचला अन् टीम इंडियाचे दरवाजे देखील खटखटवले आहेत.
मात्र, मयंक यादवला गोलंदाजीची आवड कशी लागली? अन् मयंकचा आवडता गोलंदाज कोण? पाहा काय म्हणतो मयंक
मी लहानपणी वडिलांसह टीव्ही पाहताना ब्रेट ली, डेल स्टेन आणि मिशेल जॉनसन यांची गोलंदाजी पाहत असायचो. त्यामुळे माझ्यात गोलंदाजीविषयी प्रेम वाढलं.
स्पीड नेहमी माझ्यासाठी साधारण राहिली आहे. मी जास्त फास्ट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न कधी केला नाही. मी फक्त नियमित टप्प्यात आणि लाईनमध्ये गोलंदाजी केली.
मी माझी गोलंदाजी योग्यरित्या करून आपल्या टीमला विजयाची पायरी चढवण्याचा मी नेहमी प्रयत्न करतो, असंही मयंक यादवने म्हटलं आहे.
जेव्हा निकोलस पुरनने माझ्या हाती बॉल दिला, तेव्हा माझ्या मनात विचार आला की मला आता बेस्ट प्रदर्शन करून दाखवायचंय.
जसप्रीत बुमराह माझ्यासाठी आदर्श गोलंदाज आहे. तो भारताचा नाही तर जगातील सर्वश्रेष्ठ गोलंदाज आहे. मी त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतो, असंही मयंक यादवने म्हटलंय.