वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज लेस्ली हिल्टन हा उत्तम वेगवान गोलंदाज होता.
लेस्ली हिल्टनने 1926 ते 1939 दरम्यान क्रिकेटमध्ये खूप नाव कमावले आणि वेस्ट इंडिजसाठी 6 कसोटी सामने खेळले.
1954 मध्ये हिल्टनने त्याची पत्नी लेर्लिन रोजची हत्या केली होती. त्याने लर्लिनवर पिस्तुलाने 7 वेळा गोळ्या झाडल्या होत्या.
पत्नीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची माहिती मिळाल्यानंतर त्याला राग आला आणि पत्नीशी वाद घातल्यानंतर त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही.
कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली आणि मे 1955 मध्ये त्याला फासावर लटकवण्यात आले.
क्रिकेटच्या इतिहासात मृत्यूदंडाची शिक्षा झालेला तो एकमेव क्रिकेटर आहे.