IPL 2024 : आयपीएल फ्रँचायझींच्या मालकांची संपत्ती किती? पाहा आकडे

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सचे मालक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती फोर्ब्सनुसार 8.08 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

कोलकाता नाईट रायडर्स

कोलकाता नाईट रायडर्सचा मालक आणि बॉलिवूड स्टार शाहरुख खान याची 63 अब्ज डॉलर्स एवढी संपत्ती आहे.

चेन्नई सुपर किंग्ज

चेन्नई सुपर किंग्ज या संघाची मालकी एन. श्रीनिवासन यांच्याकडे आहे. 78 वर्षीय श्रीनिवासन यांची एकूण संपत्ती ७२० कोटी रुपये आहे. श्रीनिवासन यांच्याकडे सीएसकेची 28.14 टक्के भागेदारी आहे.

रॉयल चॅलेंजर बंगळुरू

रॉयल चॅलेंजर बंगळुरू फ्रँचायझी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडच्या मालकीची आहे. कंपनीची 6,000 कोटी रुपये इतकी संपत्ती आहे.

दिल्ली कॅपिटल्स

जीएसडब्ल्यू स्पोर्ट्सचे आणि दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल यांची एकूण संपत्ती 706.3 कोटी रुपये आहे. पार्थ जिंदाल हे सर्वात तरुण आयपीएल मालक आहेत.

राजस्थान रॉयल्स

राजस्थान रॉयल्सचे मालक मनोज बडाले यांच्याकडे संघाचे 65 टक्के स्टेक आहेत. मनोज बदाले यांची एकूण संपत्ती 160 दशलक्ष डॉलर इतकी आहे.

सनरायझर्स हैदराबाद

सन ग्रुपचे मालक कलानिती मारन आणि मुलगी काव्या मारन हे सनरायझर्स हैदराबाद संघाचे मालक आहेत. कलानिथी मारन यांची संपत्ती 240 कोटी डॉलर इतकी आहे.

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्स संघाची मालकी खाजगी इक्विटी फर्म असलेल्या सीव्हीसी कॅपिटल्सकडे आहे. त्यांची एकूण संपत्ती 155 अब्ज डॉलर इतकी आहे.

पंजाब किंग्ज

पंजाब किंग्ज संघात प्रीती झिंटा, नेस वाडिया, मोहित बर्मन आणि करण पॉल यांच्यासह एकापेक्षा जास्त मालक आहेत. प्रीती झिंटाची संपत्ती 240 कोटी रुपये आहे.

लखनऊ सुपर जाएन्ट्स

लखनऊ सुपर जाएन्ट्स फ्रँचायझी संजीव गोयंका यांच्या मालकीची आहे. गोएंका यांची अंदाजे एकूण संपत्ती 270 कोटी डॉलर आहे.

VIEW ALL

Read Next Story