आयपीएलच्या सतराव्या हंगामाच्या पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर झालं असून दिल्ली कॅपिटल्स आपला पहिला सामना 23 मार्चला खेळणार आहे. मोहालीत दिल्ली कॅपिटल्स पंजाब किंग्सविरुद्ध दोन हात करणार आहे.

आयपीएलच्या जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार दिल्ली एकूण पाच सामने खेळणार आहे. दुसरा सामना 28 मार्चला राजस्थान रॉयल्सविरुद्ध जयपूरमध्ये खेळवला जाणार आहे. तर तिसरा सामना 31 मार्चला विशाखापट्टणमध्ये चेन्नईविरुद्ध होणार आहे.

दिल्लीचा चौथा सामना 3 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्सबरोबर रंगणार आहे. हा सामना विशाखापट्टणममध्ये रंगणार आहे. पाचवा सामना मुंबईविरुद्ध सात एप्रिलला मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे.

दिल्ली कॅपिटल्ससाठी एक चांगली बातमी म्हणजे स्टार फलंदाज आणि विकेटकिपर ऋषभ पंत आता पूर्णपणे फिट झाला असून आयपीएल 2024 मध्ये खेळण्याची शक्यता आहे. पण तो विकेटकिपिंग करणार नाही. फलंदाज म्हणून त्याचा संघात समावेश होईल अशी चर्चा आहे.

दिल्लीचा संघ : ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, विक्की ओस्तवाल, कुमार कुशाग्र, सुमित कुमार, पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्टजे, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, झाय रिचर्डसन, हॅरी ब्रूक, अक्षर पटेल, लुंगी एनगिडी, ललित यादव

शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, खलील अहमद, मिशेल मार्श, ईशांत शर्मा, यश ढुल, स्वास्तिक छिकारा, रिकी भुई, रसिख डार, प्रवीण दुबे, मुकेश कुमार..

दिल्ली कॅपिटल्सचा संघ आतापर्यंत एकदाही जेतेपदावर नाव कोरु शकला नाही. 2020 मध्ये दिल्लीलने अंतिम फेरीत प्रवेश केला. पण त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. गेला हंगाम तर दिल्लीसाठी अतिशय वाईट ठरला. चौदापैकी तब्बल 9 सामन्यात दिल्लीला पराभव पत्करावा लागला होता.

VIEW ALL

Read Next Story