आयपीएलचा सतरावा हंगाम सुरु झालाय. बीसीसीआयने आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रकही जाहीर केलं आहे. यानुसार 26 मे रोजी अंतिम सामना रंगणार आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलिया,वेस्टइंडिज, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड अशा परदेशी संघातील अनेक खेळाडू खेळतायत.

जवळपास प्रत्येक संघात या देशातील एकतरी खेळाडू आहे. पण आयपीएल 2024 मध्ये असा एक संघ आहे, ज्यात ऑस्ट्रेलियात, द.आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचा एकही खेळाडू नाही

आयपीएलमधल्या या संघाचं नाव आहे चेन्नई सुपर किंग्स, चेन्नई संघात 8 परदेशी खेळाडू आहेत.

या आठ परदेशी खेळाडूंमध्ये सर्वाधिक 4 खेळाडू हे न्यूझीलंड सघाचे आहेत.

उर्वरित चार परदेशी खेळाडूंमध्ये श्रीलंका, इंग्लंड आणि बांगलादेशच्या खेळाडूंचा समावेश आहे.

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव करत दमदार सुरुवात केली आहे.

VIEW ALL

Read Next Story