आयपीएल 2024 च्या अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादचा पराभव करत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं.

विजयानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू नितीश राणा आपली पत्नी सांची मारवाहबरोबर रोमॅटिंक होताना दिसला.

नितीश राणाची पत्नी सांची मारवाह सोशल मीडिआवर आपल्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर सांची आपले फोटो शेअर करते.

सांची मारवाह पुन्हा एका इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. सांची आणि नितीश राणाने आयपीएल ट्रॉफीसह फोटोसेशन केलं.

नितीश राणाची पत्नी सांची मारवाह सौंदर्याच्या बाबतीत एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. नितीश आणि सांचीची जोडी फेव्हरेट कपल म्हणून ओळखली जाते.

नितीश राणाची पत्नी सांची मारवाह व्यवसायाने इंटेरिअर डिझायनर आहे. नितीश आणि सांचीचं लग्न 2019 मध्ये झालं.

सांचीने अंसल युनिव्हर्सिटीतून स्कूल ऑफ डिझाईनमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. सांचीने अनेक प्रसिद्ध फॅशन डिझायनरबरोबर काम केलं आहे.

VIEW ALL

Read Next Story