दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा यंदा पुन्हा ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली आहे. तब्बल 14 महिन्यांनी पंतने पुनरागमन केलं आहे. तर उपकर्णधारपदी डेव्हिडि वॉर्नर आहे.

सनरायजर्स हैदराबाद

यंदाच्या आयपीएलमधला दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या पॅट कमिन्सकडे सनरायजर्स हैदराबादचं कर्णधारपद सोवण्यात आलंय. तर भुवनेश्वर कुमार उपकर्णधार असणार आहे.

किंग्स इलेव्हन पंजाब

टीम इंडियातून गेला बराच कालावधीपासून बाहेर असलेला शिखर धवन किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार आहे. तर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सॅम कुरेनवर उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे.

राजस्थान रॉयल्स

राजस्थान रॉयल्सने यंदाही कर्णधार म्हणून संजू सॅमसनला पसंती दर्शवली आहे. इंग्लंडचा जोस बटलर त्याला उपकर्णधार म्हणून साथ देईल

लखनऊ सुपर जायंट्स

2022 मध्ये आयपीएलमध्ये प्रवेश केलेल्या लखनऊ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदी सलग तिसऱ्या वर्षी केएल राहुल कायम आहे. तर निकोलस पूरन या संघाचा उपकर्णधार असणार आहे.

गुजरात टायटन्स

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये गेल्याने यंदा गुजरात टायटन्सची धुरा युवा शुभमन गिल्सच्या खांद्यावर आहे. अनुभवी फिरकी गोलंदाज राशिद खान उपकर्णधारपदी असेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

फाफ डू प्लेसिसवर बंगळुरुची रॉयल जबाबदारी असणार आहे. तर स्टार फलंदाज विराट कोहली उपकर्णधार म्हणून पहिल्या विजयासाठी प्रयत्न करेल.

कोलकाता नाईट रायडर्स

कोलकाता नाईट रायडर्सचं कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे या हंगामातही कायम ठेवण्यात आलं आहे. नीतीश राणा संघाचा उपकर्णधार असेल.

मुंबई इंडियन्स

आयपीएलमध्ये सलग पाच विजय मिळवून देणाऱ्या रोहित शर्माला हटवून यंदा मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कर्णधार केलं आहे. तर सूर्यकुमार यादव उपकर्णधाराची भूमिका पार पाडेल.

चेन्नई सुपर किंग्स

गतविजेती चेन्नई सुपर किंग्स यंदा सहाव्या जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे. आयपीएलच्या सुरुवातीपासून महेंद्रसिंग धोनीच चेन्नईचा कर्णधार आहे.

VIEW ALL

Read Next Story