बंगळुरुच्या के एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर हा सामना पार पडले. प्ले ऑफच्या चौथ्या संघाचं गणित चेन्नई वि. बंगळुरुच्या सामन्यात ठरणार आहे.
या सामन्यात क्रिकेट चाहत्यांची सर्वात जास्त लक्ष असणार आहे ते महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीच्या कामगिरीवर.
या सामन्यात विराट कोहलीला रोखण्यासाठी चेन्नईने एमएस धोनीवर नवी जबाबदारी सोपवली आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरोधातल्या महत्त्वाच्या सामन्याआधी महेंद्रसिंग धोनी नेट प्रॅक्टिसमध्ये गोलंदाजी करताना दिसला. सीएसकेने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
हा व्हिडिओ पाहुन एम एस धोणीचे चाहते आणि सीएसकेचे फॅन चांगलेच खुश झाले आहेत. आता एक दोन विकेट पक्के अशा कमेंट चाहत्यांनी केल्यात.
तसं पाहिलं तर आयपीएलमध्ये धोनी आतापर्यंत 263 सामने खेळला आहे. पण यात त्याने एकदाही गोलंदाजी केलेली नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीने गोलंदाजी केली आहे. 90 कसोटी सामन्यात धोनीने 96 चेंडू टाकलेत आणि 67 धावा दिल्यात. त्याला एकही विकेट घेता आलेली नाही.
तर 350 एकदिवसीय सामन्यात धोनीने 36 चेंडूत 31 धावादेत 1 विकेट घेतली आहे. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यातही धोनीने कधी गोलंदाजी केलेली नाही.