सामान्य कॅटेगरीचं तिकीट किती?

सामान्य कॅटेगरीमधील सर्वात महागडं तिकीट 3,437 रुपयांना आहे. तर स्पेशल कॅटेगरीमधील तिकीट 4,840 रुपयांना उपलब्ध आहे.

विक्रमी तिकीट दर

कोणत्याही आयपीएल सामन्यासाठी सर्वसामान्य चाहत्यांकडून आकारली जाणारी ही सर्वाधिक रक्कम ठरणार आहे.

कितीचं सर्वात महागडं तिकीट?

सीएसके विरुद्ध आरसीबीदरम्यानच्या या सामन्याचं सर्वात महागडं तिकीट 42,350 रुपये इतकी आहे.

एका दुचाकी इतकी किंमत

या सामन्यासाठी सर्वात स्वस्त तिकीट 2,405 रुपयांना उपलब्ध आहे. तर सर्वात महागड्या तिकीटाची किंमत एका दुचाकी इतकी आहे.

ही संधी चाहत्यांसाठी खास

कोहली आणि धोनीला घरच्या मैदानावर पाहण्याची ही शेवटची संधी बंगळुरुच्या चाहत्यांना चुकवायची नक्कीच नसेल.

ही मॅच स्पेशल कारण

आरसीबी आणि चेन्नईचा हा सामना यासाठी खास असणार आहे कारण हे यंदाचं धोनीचं शेवटचं आयपीएल असू शकतं अशी दाट शक्यता आहे.

17 तारखेला सामना

आरसीबीने आपल्या घरच्या मैदानावरील सामन्यासाठीची तिकीट विक्री सुरु केली आहे. चेन्नईविरुद्धचा बंगळुरुचा हा सामना 17 एप्रिल रोजी होणार आहे.

तिकीटं महागली

मैदानामध्ये प्रत्यक्षात जाऊन सामना पाहणं महाग पडणार आहे कारण तिकीटांचे दार फार वाढवले आहेत.

खिसा हलका करावा लागणार

मात्र यंदाच्या पर्वामध्ये सीएसके विरुद्ध आरसीबीचा सामना पाहण्यासाठी चाहत्यांना खिसा जरा जास्तच हलका करावा लागणार आहे.

सीएसके आणि आरसीबीचे लाखो चाहते

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन असे संघ आहेत की त्यांच्या चाहत्यांची संख्या लाखोंमध्ये आहेत. या संघांचा फॅनबेस फारच मोठा आहे.

31 मार्चपासून आयपीएलला सुरुवात

यंदाच्या म्हणजेच 2023 च्या आयपीएल पर्वाची सुरुवात 31 मार्चपासून होत आहे. क्रिकेट चाहते या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

VIEW ALL

Read Next Story