इंडियन प्रीमिअर लीग 2024 साठी खेळाडूंची ऑक्शन लीस्ट समोर आली आहे. 19 डिसेंबरला दुबईत मिनी ऑक्शन पार पडणार आहे.

आयपीएल ऑक्शनसाठी यावेळी एकूण 333 खेळाडूंचं रजिस्ट्रेशन झालं आहे. यातल्या केवळ 77 खेळाडूंची निवड होणार आहे.

ऑक्शन लीस्ट समोर येताच महाराष्ट्राच्या एका खेळाडूची आयपीएल कारकिर्दही संपण्याच्या मार्गावर आहे. अंतिम यादीत या खेळाडूचं नाव नाहीए.

या खेळाडूचं नाव आहे केदार जाधव. ऑक्शन लीस्टमध्ये केदारचं नाव नाहीए. त्याची बेस प्राईज 2 कोटी रुपये इतकी होती.

केदार जाधव आता 38 वर्षांचा आहे. नव्या हंगामापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने त्याल रिलीज केलं. त्यानंतर त्याने आपलं नाव ऑक्शन लीस्टमध्ये टाकलं

ऑक्शन लीस्टसाठी तब्बल 1200 खेळाडूंनी आपली नावं दिली होती. यातल्या 333 खेळाडूंची निवड करण्यात आली. पण यात केदार जाधवचं नाव नाहीए.

38 वर्षांचा केदार जाधव भारतासाठी 2020 मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. तर 2017 मध्ये तो शेवटचा टी20 सामना खेळला. आयपीएलमध्ये तो RCB, CSK, MI संघातून खेळला आहे.

VIEW ALL

Read Next Story