यशस्वी जयस्वालची रेकॉर्डब्रेक कामगिरी, सेहवाग-हिटमॅनला सोडलं मागे

Jan 26,2024


हैदराबादमधील पहिल्या टेस्ट मॅचमध्ये यशस्वी जयस्वालने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. या रेकॉर्डमुळे जयस्वालने भारताच्या मोठ-मोठ्या ओपनर्सना मागे टाकले आहे.


यशस्वी जयस्वालने इंग्लंडविरुद्धच्या हैदराबाद टेस्टच्या पहिल्या डावात स्फोटक फलंदाजी करत 74 बॉलमध्ये 80 रन केलेत.


यशस्वी जैस्वालने 10 फोर आणि 3 सिक्स मारत अफलातून फलंदाजी केली. आपल्या फलंदाजीमुळे यशस्वी जयस्वालने वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्माचे रेकॉर्डही मोडला आहे


यशस्वी जयस्वालने भारतासाठी टेस्ट क्रिकेटमधील डावात पहिल्या 4 ओव्हर्समध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.


भारताच्या पहिल्या डावात ओपनिंगला आलेल्या यशस्वी जयस्वालने पहिल्या 4 ओव्हर्समध्ये 27 रन केले होते.


यापूर्वी वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांनी टेस्टमध्ये पहिल्या चार ओव्हर्समध्ये 25-25 रन केले होते. सेहवागने 2010 साली श्रीलंकेविरुद्ध तर रोहितने 2023 साली वेस्ट इंडिजविरुद्ध ही कामगिरी केली होती.


भारतीय स्पिनर्सने इंग्लिश खेळाडूंची दाणादाण उडवली. पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या टीमला 246 रनमध्ये गुंडाळलं.

VIEW ALL

Read Next Story