आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत सेमीफायनलमध्ये शतक झळकावत विराट कोहलीने टीम इंडियाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.

मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारत-न्यूझीलंड सेमीफायनल सामना खेळवण्यात आला. विराटने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतली 50 वी सेंच्युरी पूर्ण केली.

सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विराटन कोहलीने 117 धावांची दमदार खेळी केली. यंदाच्या विश्वचषकातलं हे त्याचं तिसरं शतक ठरलं

शतक पूर्ण केल्यानंतर विराट कोहलीने सचिन तेंडुलकरला नमस्कार केला तर पत्नी अनुष्का शर्माला फ्लाईंग किस दिला.

या दरम्यान कोहलीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात तो पॅव्हेलिअनच्या रेलिंगवर लटकून अनुष्काला पाहण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.

पॅव्हेलिअच्या अगदी वरच्याच मजल्यावर अनुष्का शर्मा बसली होती. तिला पाहण्यासाठी विराटचा आटापिटा सुरु होता.

विराटचं हे कृत्य कॅमेरात कैद झालं असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. लोकांनी men will be men अशी प्रतिक्रिया देत आहेत.

VIEW ALL

Read Next Story