आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने आपला विजयरथ कायम ठेवला आहे . टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव करत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केलीय या विजयाबरोबर टीम इंडिया पॉईंटटेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचलीय.

टीम इंडियाबरोबरच सलग तीन विजय मिळवण्याचा विक्रम न्यूझीलंडनेही केला आहे. पॉईंटटेबलमध्ये न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

पण जबरदस्त फॉर्मात असलेल्या न्यूझीलंडला एक मोठा धक्का बसला आहे. मोठ्या काळानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या कर्णधार केन विल्यम्सनच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झालं आहे.

अंगठ्याची दुखापत गंभीर असल्याने केन विल्यम्सन विश्वचषकातील पुढचे तीन सामने खेळू शकणार नाहीए. या भारताविरुद्धच्या सामन्याचाही समावेश आहे. 22 ऑक्टोबरला भारत-न्यूझीलंड सामना रंगणार आहे.

केन विल्यम्सनच्या गैर हजेरीत टॉम लॅथम न्यूझीलंड संघाची धुरा सांभाळणार आहे. चेन्नईत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात केनच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर 78 धावांवर तो रिटायर्ड हर्ट झाला.

याआधी आयपीएलमध्ये खेळताना केन विल्यम्सनच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर तो बराच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासन दूर होता. दुखापतीतून लवकर सावल्यास तो विश्वचषकाच्या शेवटच्या टप्प्यात तो खेळू शकेल.

18 ऑक्टोबरला अफगाणिस्तानविरुद्धचा सामना, 22 ऑक्टोबरला भारताविरुद्धचा सामना आणि 28 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना केन विल्यम्सन खेळू शकणार नाहीए.

VIEW ALL

Read Next Story