आयसीसी विश्वचषका दरम्यान भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने महिला क्रिकेट संघासाठी नव्या कोचची निुयक्ती केली आहे.
अनुभवी क्रिकेटपटू अमोल मुझुमदार भारतीय सीनिअर महिला क्रिकेट संघाचा मुख्य कोच असणार आहे. बीसीसीआयने अमोल मुझुमदारच्या नावाची घोषणा केली आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य कोचपदी नियुक्ती ही माझ्यासाठी सन्मानजनक गोष्ट असल्याचं अमोल मुझुमदार याने म्हटलं आहे.
अमोल मुझुमदार 171 फर्स्ट क्लास सामने खेळला आहे. यात त्याने 11हजार 167 धावा केल्या आहेत. 260 हा त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
अमोल मुझुमदार 1994 मध्ये भारताच्या अंडर-19 संघाचा उपकर्णधार होता. भारत-ए संघातूनही तो राहलु द्रविड आणि सौरव गांगुली यांच्याबरोबर खेळला आहे.
पण दुर्देवाने त्याला टीम इंडियात कधीच संधी मिळाली नाही. 2006-07 साली अमोल मुझुमदारच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाला रणजी ट्रॉफीचं जेतेपद मिळवून दिलं.
मुंबईनंतर अमोल मुझुमदार आसाम संघासाठी रणजी ट्रॉफी खेळला. 2014 साली त्याने प्रथम श्रेमी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.