'या' 10 मैदानात होणार सामने
आगामी टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) तारखांची घोषणा केली आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडीज या दोन्ही देशातील तब्बल दहा शहरांमध्ये हा वर्ल्ड कप खेळला जाईल.
स्पर्धेची सुरुवात 4 जून रोजी होऊन अंतिम सामना 20 जून रोजी पार पडेल.
वेस्ट इंडीजमधील अँटिग्वा आणि बार्बुडा, बार्बाडोस, डोमिनिका, गयाना, सेंट लुसिया या शहरात सामना खेळवला जाईल.
त्याचबरोबर त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि सेंट व्हिन्सेंट आणि द ग्रेनेडाइन्स या ठिकाणी या शहरांमध्ये विश्वचषक खेळला जाईल.
अमेरिकेतील सामने आता फ्लोरिडा, न्यूयॉर्क व डेल्लास येथे खेळले जातील.
आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी स्कॉटलँड आणि आयर्लंड पात्र ठरले आहेत.
आता 20 संघात होणारा लांबलचक वर्ल्ड कप आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे.