वाद कसा मिटला? नवीन-कोहलीमध्ये मैदानात काय बोलणं झालं?

वर्ल्डकपमधील भारत आणि अफगाणिस्तान सामना खूपच रंजक ठरला.

या सामन्यात एक मोठी गोष्ट ठरली ती म्हणजे विराट कोहली आणि नवीन उल हक यांची झालेली मैत्री

वर्ल्डकपच्या या सामन्यात नवीन आणि विराट या दोघांनीही आपले वाद मिटवत एकमेकांना मिठी मारली. दरम्यान पण हे नेमकं कसं घडलं आणि या दोघांमध्ये काय बोलणं झालं याचा खुलासा नवीनने केला आहे.

सामन्यानंतर नवीन म्हणाला, 'माझ्यात आणि कोहलीमध्ये जे काही घडले ते मैदानातच होते. मैदानाबाहेर आमच्यात वाद नव्हता.

लोकांनी आणि माध्यमांनी हे प्रकरण मोठे केले. त्यांना फॉलोअर्स वाढवण्यासाठी अशा केसेसची गरज आहे, असंही नवीन म्हणाला.

नवीन म्हणाला, 'कोहलीने मला सांगितलं की , आपण त्या गोष्टी मागे सोडल्या पाहिजेत. मी देखील त्याला उत्तर दिले, 'हो, या गोष्टी संपल्या आहेत.'

VIEW ALL

Read Next Story