वर्ल्डकपमधील पराभवानंतर टीम इंडिया आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची टी20 मालिका खेळून पुढील वर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषक २०२४ च्या तयारीला सुरुवात करेल.

युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंह, तिलक वर्मा, जितेश शर्मा आणि मुकेश कुमारसारख्या खेळाडूंनी गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्यांना या सामन्यात संधी देण्यात आली आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.

पहिला T20I सामना आज म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. दोन्ही कर्णधार टॉससाठी अर्धा तास आधी मैदानात उतरतील.

तुम्ही भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला T20I सामना स्पोर्ट्स 18 वर टीव्हीवर पाहू शकाल. तर या T20 सामन्याचे थेट प्रक्षेपण देखील DD Sports वर होईल.

भारत

सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.

ऑस्ट्रेलिया

मॅथ्यू वेड (कर्णधार), आरोन हार्डी, जेसन बेहरनडोर्फ, सीन अ‍ॅबट, टिम डेव्हिड, नेथन एलिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टोइनिस, केन रिचर्डसन, अ‍ॅडम झॅम्पा.

VIEW ALL

Read Next Story