भारताचा स्टार क्रिकेटर आर अश्विन याने 18 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
आर अश्विन याने तब्बल 14 वर्ष क्रिकेटमध्ये भारतासाठी उत्तमोत्तम कामगिरी केली. दरम्यान त्याने क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये एकूण 765 विकेट्स घेतले.
भारतासाठी क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंना निवृत्तीनंतर त्यांच्या कारकिर्दीप्रमाणे बीसीसीआय पेन्शन देते. यात ते भारतासाठी तसेच फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये किती सामने खेळले आहेत हे निकष सुद्धा लावले जातात.
विनोद कांबळी 9 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला, दरम्यान त्याने 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये त्याने एकूण 3500 हून अधिक धावा केल्या.
विनोद कांबळीला बीसीसीआयकडून महिन्याला 30,000 हजार रुपये पेन्शन मिळते.
अश्विनने त्याच्या कारकीर्द 106 टेस्ट, 116 वनडे तर 65 टी 20 सामने खेळले आहेत.
बीसीसीआयच्या पेन्शन योजनेच्या आधारे आर अश्विनला बीसीसीआयकडून दर महिन्याला 52,500 रुपये पेन्शन मिळू शकते.