भारतातच यावर्षीचा World Cup

भारत यावर्षी आपल्या घऱच्या मैदानांवरच एकदिवसीय विश्वचषक खेळणार आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा पार पडणार आहे.

Aug 24,2023

भारताने दोन वेळा जिंकला आहे World Cup

याआधी भारतीय संघाने 1983 मध्ये कपिल देव आणि 2011 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात वर्ल्डकप जिंकला आहे.

धोनीने लगावला होता विजयी षटकार

2011 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात धोनीने विजयी षटकार लगावला होता. धोनी प्लेअर ऑफ द मॅचही राहिला होता.

गंभीरने केल्या होत्या 97 धावा

अंतिम सामन्यात गौतम गंभीरने 97 धावा केल्या होत्या. तर युवराज सिंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरला होता.

पण चर्चा फक्त धोनीच्या षटकाराची

पण चाहते आजही धोनीच्या षटकाराबद्दलच चर्चा करताना दिसतात. यामुळे नाराज झालेल्या गौतम गंभीरने एका मुलाखतीत संताप व्यक्त केला आहे.

"एकटा खेळाडू स्पर्धा जिंकवू शकत"

फक्त एक खेळाडू स्पर्धा जिंकवू शकत नाही. असं असतं तर भारताने आतापर्यंतचे सगळे वर्ल्डकप जिंकले असते असं गंभीरने म्हटलं आहे.

गंभीरचा संताप

"मी 97 धावा केल्या त्याबद्दल बोलू नका. पण युवराज सिंग, झहीर खान, मुनाफ पटेल यांनी चांगली कामगिरी केली होती," असं गंभीरने सांगितलं आहे.

"सचिन तेंडुलकरनेही शतकं ठोकली होती"

"सचिन तेंडुलकरनेही त्या वर्ल्डकपमध्ये 3-4 शतकं ठोकली होती. किती लोक या सर्व गोष्टींबद्दल बोलतात".

"सोशल मीडियामुळे फक्त षटकाराची चर्चा"

"पण लोक आजही फक्त त्या षटकाराबद्दल बोलतात. हे सर्व मीडिया आणि सोशल मीडियामुळे आहे," असा संताप गंभीरने व्यक्त केला आहे.

VIEW ALL

Read Next Story